पहिल्या आठवड्यात यंत्रांची चाचणी घ्या; अपघात टाळण्यासाठी कारखान्यांना सूचना

पहिल्या आठवड्यात यंत्रांची चाचणी घ्या; अपघात टाळण्यासाठी कारखान्यांना सूचना
Updated on

नवी दिल्ली- लॉकडाउननंतर उद्योग आणि व्यवसाय कशापद्धतीने सुरू करायचे याची चाचपणी सरकारी पातळीवर सुरू असताना उद्योगांमधील संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) औद्योगिक क्षेत्रासाठी काही सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विशाखापट्टणजवळील रासायनिक कारखान्यात झालेल्या वायू गळती अपघाताच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ‘एनडीएमए’ने या सूचना जारी केल्या आहेत. दीड महिन्यांहून अधिक काळ चाललेला लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर पुन्हा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करताना अपघात होऊ नयेत  यासाठी सर्व सुरक्षा निकषांचे पालन केले जावे असे सरकारने म्हटले आहे. 

उत्पादनाचा अट्टहास नको 
पहिल्या आठवड्यात सर्व यंत्रसामग्रीची चाचणी घेतली जावी. त्यानंतरच उत्पादनाला सुरवात करावी. अवजड आणि गुंतागुंतीची रचना असलेल्या यंत्रसामग्रीची नियमित देखभाल झाली नाही तर अभियंते, कामगारांसाठी ते जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे कारखाना सुरू होताच उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा अट्टहास न धरता सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे या शिफारशींत नमूद करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही काळजी घ्यावी 
लोकवस्तीजवळील कारखान्यांनी  विशेष काळजी घ्यायलाच हवी 
कारखान्यात दर दोन ते तीन तासांनी साफसफाई करण्यात येणे गरजेचे 
सर्व उपकरणे, यंत्रसामग्री निर्जंतुक केली जावी 
कामगारांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी कारखाना व्यवस्थापनाने घ्यावी 

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचना 
या सूचनांचे कटाक्षाने पालन व्हावे यासाठी एनडीएमएने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रही पाठविले आहे. लॉकडाउनच्या काळात कारखाने बंद राहिल्याने उद्योगांसाठी आदर्श नियमावलीचे पालन झाले नसेल. त्यामुळे यंत्रसामग्रीमध्ये दोष निर्माण होणे, रसायने, ज्वालाग्राही पदार्थांची साठवण यामध्ये सुरक्षेचे निकष पाळले गेले नसल्यास जोखीम वाढू शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com