esakal | धक्कादायक! जेवणाच्या ताटावरून जवानांना उठवले
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! जेवणाच्या ताटावरून जवानांना उठवले

- शिवभक्तांकडून कारवाईची मागणी

धक्कादायक! जेवणाच्या ताटावरून जवानांना उठवले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी भारतीय जवानांसोबत गैरवर्तन केले. त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते. महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून कार्यक्रमात हे जवान शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आले होते. दुपारी जेवणाच्या वेळी हे जवान जेव्हा कॅन्टीनमध्ये गेले असताना सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरुन बाहेर हाकलले.

शिवभक्तांकडून कारवाईची मागणी

जवानांचा सन्मान योग्य पद्धतीने व्हायला हवा. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांना धमकीची भाषा वापरण्यात आली, हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत गेला. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यात आली.

loading image