विमा पॉलिसी काढायची? चिंता नको, व्हॉट्सॲप आहे ना| Insurance policy On WhatsApp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Insurance policy on WhatsApp

विमा पॉलिसी काढायची? चिंता नको, व्हॉट्सॲप आहे ना

कोरोनाचे (coronavirus) रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे लोकांना चिंता वाटू लागली आहे. अशात विमा पॉलिसी (Insurance policy) काढण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. या कठीण काढात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्सने ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप (WhatsApp) सेवा सुरू केली आहे. याच्या मदतीने घरबसल्या काही क्लिकमध्ये विमा पॉलिसी काढता येणार आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पॉलिसीसाठी दावाही दाखल करता येणार आहे.

स्टार हेल्थ (Star Health) ॲण्ड अलाईड इन्शुरन्सने (Allied Insurance) देशातील कोरोना साथीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित ठेवणे हा आहे. स्टार हेल्थचे ग्राहक व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) माध्यमातून एंड-टू-एंड सेवेचा लाभ घेऊ शकतात. स्टार हेल्थ किरकोळ आरोग्य, समूह आरोग्य, वैयक्तिक अपघात आणि परदेश प्रवासासाठी विमा संरक्षण देते. भारतीय आरोग्य विमा बाजारात त्याचा वाटा १५.८ टक्के आहे.

हेही वाचा: MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्टार हेल्थच्या ग्राहकांना व्हॉट्सॲप नंबरवरून +९१ ९५९७६५२२२५ वर ‘Hi’ पाठवावा लागेल. या सेवेच्या मदतीने ग्राहक नवीन पॉलिसी घेऊ शकतात. तुम्ही कॅशलेस क्लेम देखील दाखल करू शकता. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पॉलिसी डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतात, असे कंपनीने सांगितले. (Insurance policy on WhatsApp)

हा पर्याय देखील उपलब्ध

व्हॉट्सॲप (WhatsApp) व्यतिरिक्त स्टार हेल्थचे ग्राहक कंपनीच्या चॅट असिस्टंट - ट्विंकल, कस्टमर केअर नंबर, एजंट, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालय आणि स्टार पॉवर ॲपद्वारे देखील विमा कंपनीशी संपर्क साधू शकतात. या सुविधांचा वापर करून कंपनीचे ग्राहक घरबसल्या विमा पॉलिसी (Insurance policy) घेऊ शकतात.

कधीही आणि कुठेही संपर्कात राहू

व्हॉट्सॲप (WhatsApp) भारतात खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की हे प्लॅटफॉर्म आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास मदत करेल. तसेच त्यांच्याशी आमची प्रतिबद्धता देखील वाढवेल. याच्या मदतीने आम्ही आमच्या पॉलिसीधारकांशी कधीही आणि कुठेही संपर्कात राहू शकू, असे स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top