
एका महिलेने दुसऱ्या जातीतील पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिच्या कुटुंबातील ४० सदस्यांना शुद्धीकरण विधीसाठी मुंडण करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आणि समाजात परत स्वीकारण्यासाठी त्यांना हा विधी पूर्ण करावा लागला. याशिवाय दंड म्हणून प्राण्याचा बळी देण्यात आला. ही संतापजनक प्रकार ओडिशातील रायगडा जिल्ह्यात घडला.