Budget 2024 Speech: विकसित भारतासाठी 'या' चार जातींवर लक्ष केंद्रीत; अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

Budget 2024 Focus aspects : गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांच्या विकासावर फोकस
budget 2024 speech
budget 2024 speech esakal

Interim budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे संसदेत बजेट मांडत आहेत. यावेळी सुरुवातीला त्यांनी भाषणादरम्यान सरकारनं आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पांमधून काय कामं केली याचा पाढा वाचला.

तसेच विकसित भारतासाठी चार जातींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. (interim Budget 2024 We need to focus on Garib Mahilayen Yuva and Annadata says FM Nirmala Sitharaman)

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, "आपल्या गरीब, महिला, युवा, अन्नदाता या चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. या चार वर्गाच्या इच्छा-आकांशा यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं"

सरकारच्या दहा वर्षातील कामगिरीचा आढावा घेताना सीतारामन पुढे म्हणाल्या, स्कील इंडिया मिशनच्या माध्यमातून १.४ कोटी तरुणांनी ट्रेनिंग देण्यात आलं. तसेच ५४ लाख स्कील्ड तरुण तयार करण्यात आले. तसेच ३००० नवीनं आयटीआय निर्माण करण्यात आल्या. तसेच उच्च शिक्षणासाठी 7 IITs, 16 IIITs, 7 IIMs, 15 AIIMS and 390 विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. (budget 2024 updates)

महिलांबाबत केलेल्या कामांची माहिती देताना सीतारामन म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं आहे. STEM कोर्सेसमध्ये मुली, महिला यांची ४३ टक्के नोंदणी झाली आहे. हे प्रमाण जगातील महिलांचं सर्वाधिक प्रमाण आहे. या सर्व गोष्टींमुळं वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाक बेकायदा ठरवला. (budget highlights 2024)

संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळांमध्ये एक तृतीयांश महिलांसाठी आरक्षण लागू केलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी ७० टक्के घरांची निर्मिती झाल्यानं महिलांचा आत्मसन्मान वाढला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com