आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International flights starting know the guidelines
आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

भारतातून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ आंतराष्ट्रीय सेवा बंद होत्या. पण आता कोरोना संसर्ग कमी झाल्यावे पुन्हा या सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नव्या गाईडलाईन्स आखून देण्यात आल्या आहेतत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना मिळणार बूस्टर डोस

अशा आहेत गाईडलाईन्स

१) नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, केबिन क्रू सदस्यांना यापुढे पीपीई किट घालण्याची आवश्यकता नाही.

२) विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या पॅट-डाऊनच्या चौकशीला सुरूवात करण्यात येणार आहे.

३) एअरलाइन्सना आंतरराष्ट्रीय विमानातील ३ आसनं रिक्त ठेवण्यावरील निर्बंध काढण्यात आले आहेत. तर, विमानतळांवर आणि उड्डाणांमध्ये फेस मास्क घालणे, हाताची स्वच्छता/सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे.

४) एअरलाइन्स काही अतिरिक्त PPE कीट, सॅनिटायझर आणि N-95 मास्क घेऊन जाऊ शकतात, जे हवेतील केसेसशी संबंधित कोणत्याही श्वसन संक्रमणास, प्रवाशांसाठी तसेच क्रू यांच्यासाठी वापरू शकतात.

हेही वाचा: DRDO: भारताकडून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, पुढील दोन महिन्यांमध्ये हवाई वाहतूक सेवा कोरोनाच्या आधी ज्याप्रकारे होती. त्याच प्रकारे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Web Title: International Flights To And From India Resume Here Are New Rules

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..