तेहरान : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सहा दिवस पूर्ण होत आली आहेत आणि सध्या युद्धाचा सातवा दिवस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचे पुतणे महमूद मोर्दाखानी (Mahmoud Moradkhani) यांनी त्यांच्या काकांच्या राजवटीवर थेट टीका केलीये. 'इस्लामी रिपब्लिकचा अंतच शांततेचा एकमेव मार्ग आहे,' असं त्यांनी म्हटलंय.