International Peace Day : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस का साजरा करतात; जाणून घ्या इतिहास आणि संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

international peace day

International Peace Day : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस का साजरा करतात; जाणून घ्या इतिहास आणि संकल्पना

पुणे : यावर्षी आंतर राष्ट्रीय पातळीवर बऱ्याच उलाढाली झाल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध असो वा तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानवर मिळवलेला ताबा असो. या घटना आपल्यातील माणुसकी, प्रेस संपले आहे हेच दर्शवतात. लाखो लोक,स्त्रीया, लहान मुले मृत्युमुखी पडले. या सगळ्या चित्रात निळ्याशार आकाशात स्वच्छंदी उडत असलेलं एक पांढर शुभ्र कबुतर मनाला शांती देतं. हे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.

दरवर्षीप्रमाणे आज जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस (International Day Of Peace) साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) जगभरात शांततेचा संदेश दिला आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय पातळीवर देशा-देशात शांतता, गोडवा आणि बंधुभाव रहावा हा आहे. सर्व देशांमध्ये शांतता, प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

कसा साजरा करतात शांतता दिवस

पांढऱ्या कबुतराला शांतीचे दूत मानले गेले आहे. या दिवशी पांढरी कबूतर आकाशात उडवून शांतीचा संदेश दिला जातो. संयुक्‍त राष्‍ट्रसंघापासून विविध संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्‍ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

काय आहे संकल्पना

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्यासाठी एक थीम जारी केली आहे. या वर्षीची थीम आहे "वंशवाद संपवा, शांतता निर्माण करा." म्हणजेच जातिवाद दूर करा, शांततेला प्रोत्साहन द्या.

शांती दिनाचा इतिहास

संयुक्त राष्ट्र संघाने 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा 1982 मधील सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यात आला. यानंतर, 1982 ते 2001 पर्यंत, दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्यात आला. पण, त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली.

शांततेची घंटा

दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात (न्यूयॉर्क) संयुक्त राष्ट्रांच्या शांततेची घंटा वाजवून होते. जपानच्या युनायटेड नॅशनल असोसिएशनने भेट दिलेल्या आफ्रिका वगळता सर्व खंडांतील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून ही घंटा बनवली आहे. ही घंटा युद्धातील माणसाच्या मोलाची आठवण करून देणारी आहे. जगात सदैव शांतता असावी असे त्याच्या बाजूला लिहिले आहे.

Web Title: International Peace Day Theme Significance And History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsHistory