Internet Issue: सोशल मीडियावर युजर्सचा सर्व्हे

फक्त तुम्हीच नाही तर देशातील प्रत्येक तीन ब्रॉडबँड युजर्सपैकी दोन युजर्सनां इंटरनेट कनेक्शनची समस्या आहे, का ते जाणून घ्या.
Internet Issue
Internet Issueesakal

भारतात इंटरनेट सेवा अतिशय वेगाने विस्तारल्यामुळे आता ब्रॉडबँड कनेक्शन्सही कॉमन झाले आहेत. ते गावोगावी पोहोचले असूनही लोकांच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. याचे कारण म्हणजेच ब्रॉडबँड (Broadband) सेवांचा 'दर्जा'. गेल्या शुक्रवारी जेव्हा देशाच्या अनेक भागात विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत होते, ऑनलाइन क्लास करत होते. काहीजण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या बैठकांमध्ये हजेरी लावत होते . अशावेळी अचानकच इंटरनेट कनेक्शन बंद पडले. काही मिनिटांनंतर #Airteldown सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.हा व्यत्यय मात्र काही मिनिटांचाच होता पण तरीही थोडा वेळ इंटरनेट बंद पडल्याने लोकांना आपले इंटरनेटवर कितपत अवलंबून आहोत याची जाणीव नक्कीच झाली. विशेषत: कोविड-१९ च्या काळात. घरात कैद असणारी मुलं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वर्ग घेत आहेत. घरी वर्क फ्रॉम होमसारख्या कारणांमुळे त्याचे आई-वडील स्मार्ट फोन आणि लॅपटॉपमध्ये व्यस्त असतात.त्यामुळेच या दिवसांतील दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले असून परिणामतः यावेळी ब्रॉडबँड वापरणाऱ्यांची संख्या वाढून तब्बल अडीच कोटी झालीयं.

स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार जगभरात इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा क्रमांक १२२ वर आहे. ओकलाच्या (Ookla) वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कलनेही याबाबत एक सर्वे केला आहे. यामध्ये अनेकांनी इंटरनेट सुविधांबाबत आपलं मत व्यक्त केलं. काही लोकं म्हणतात की अचानक त्यांचे कनेक्शन जाते (Internet Connection) अचानक येते.कधी कधी स्वत:च वेग मंदावतो.अनेकदा तक्रारी करूनही समस्या सुटत नाही. कंपनीला तक्रार केली असता कंपनीची माणसं फोन करून प्रॉब्लेम दूर झाल्याचं सांगतात. पण काम करताना , लक्षात येतं की समस्या अजूनही तशीच कायम आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्थानिक सर्कलने(Local Circle)या मुद्द्यांवर ब्रॉडबँड सेवेच्या वापरकर्त्यांकडून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील ३३९ जिल्ह्यांतील सुमारे ३० जण यात सहभागी झाले होते. याबाबतीत विविध समस्यांवर त्यांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली.

पाहा युजर्स काय म्हणाले.

इंटरनेटच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या कोणती होती?

३३ टक्के- नेहमी नेहमी बंद पडणं.

३३ टक्के- कमी स्पीड.

७ टक्के- इतर समस्या.

२१ टक्के- काहीही तक्रार नाही.

४ टक्के- काही सांगता येत नाही.

तक्रारीनंतर किती काळात समस्येचे निराकरण झाले ?

११ टक्के -७ पेक्षा जास्त दिवसांनी .

५ टक्के -४ ते ७ दिवसांमध्ये .

३० टक्के - १ ते ३ दिवसांत .

३८ टक्के -२४ तासांमध्ये .

७ टक्के - कधीच ठीक नाही झाले.

दुसरी ब्रॉडबँड सेवा निवडण्याचं तुमचं कारण काय असेल ?

३५ टक्के - चांगले कनेक्शन क्वालिटी.

१९ टक्के- याच स्पीड सोबत कमीमध्ये मंथली प्लॅन.

१६ टक्के- याच प्लॅन मध्ये अधिक स्पीड.

२२ टक्के- बदलायचंच नाही .

४ टक्के- इतर कारणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com