दाऊदवरून पाकची बोलती बंद !

इंटरपोलच्या संमेलनात ‘एफआयए’चे मोहसीन बट तोंडघशी
Interpol meeting pakistan fia director general mohsin butt refuse to answer on hafiz saeed and dawood ibrahim
Interpol meeting pakistan fia director general mohsin butt refuse to answer on hafiz saeed and dawood ibrahim
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांना भारताकडे कधी सोपविणार? या प्रश्नावर पाकिस्तानची बोलतीच बंद झाल्याचे दृश्य आज पहायला मिळाले. इंटरपोलच्या जागतिक संमेलनात सहभागी झालेले पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसीन बट यांनी याबाबतच्या प्रश्नावर, ‘नो कमेंट्‌स’ इतकेच बोलत उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यांचा एकूणातील अविर्भाव हा ‘तोंड लपविण्याचा‘ असल्याचे ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या इंटरपोलच्या जागतिक बैठकीत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाच्या सहभागाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत परिस्थिती स्पष्ट झाली नव्हती.

बट यांच्यासह पाकिस्तानचे दोन सदस्यांचे शिष्टमंडळ वाघा सीमेवरून आज सकाळी भारतात पोहोचले. मोहसीन बट हे ‘एफआयए’ महासंचालक आहेत. या संमेलनाच्या दोन सत्रांदरम्यान पत्रकारांनी त्यांना दाऊद इब्राहिम आणि लष्करे तैयबाचा प्रमुख सईद यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हे दोघेही दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन आहेत. पाकिस्तान या दोघांना भारताच्या हवाली करणार का? यावर बट यांनी टाळाटाळ केली. सुरवातीला प्रश्न एकताच त्यांनी तोंडावर बोट ठेवले. त्यानंतर त्यांनी काही पुटपुट करत उत्तर देण्यासच नकार दिला. ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत हाफिज सईदवर कायदेशीर करण्यासाठी जागतिक पातळीवर लढा देत आहे. भारताने वेळोवेळी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीपासून आमसभेतही उपस्थित केला आहे. अमेरिकेनेही, हाफिजविरुद्धचा खटला लवकर चालवावा, अशा शब्दांत पाकिस्तानचे कान टोचले होते.

इंटरपोलची परिषद सुरू

नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आज इंटरपोलची परिषद सुरू झाली. ही ९० वी परिषद १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने परिषदेची सुरवात झाली. या बैठकीत इंटरपोलचे १९५ सदस्य देशांचे प्रतिनिधी सामील झाले असून त्यात पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे २५ वर्षानंतर भारतात इंटरपोलची परिषद होत आहे. यापूर्वी १९९७ रोजी भारतात इंटरपोलची परिषद झाली होती. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासर अल रायसी आणि सरचिटणीस जुर्गन स्टॉक आणि सीबीआयचे संचालक देखील उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com