Section 377: मृतदेहावर बलात्कारातील आरोपी निर्दोष! कायदा बदला, हायकोर्टाचे केंद्राला निर्देश

कायद्यातील त्रृटींचा फायदा आरोपी कसे घेतात, याचं कर्नाटकातील घटना पुरावा आहे.
Karnataka high court
Karnataka high courtesakal

नवी दिल्ली : आधी तरुणीची हत्या करुन नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला कनिष्ठ न्यायालयानं हत्या आणि बलात्काराचा दोषी मानलं आहे. यानंतर त्याला शिक्षा सुनावली दंडही ठोठावला.

पण आठ वर्षानंतर आता कर्नाटक हायकोर्टानं त्याला हत्येचा दोषी मानलं पण बलात्कार प्रकरणात निर्देष मुक्तता केली. याचं कारण म्हणजे कायद्यातील त्रृटी.

हा निकाल देताना हायकोर्टानं थेट केंद्राला निर्देश देताना कायद्यात सुधारणा करण्यास सांगितलं. (IPC Section 377 should be amended Karnataka HC orders Centre in rape case on women dead body)

Karnataka high court
Crime news : पतीनेच केले स्वतःच्या पत्नीचे अपहरण! मित्रांसमवेत बलात्कार करून अशी केली हत्या...

हायकोर्टानं निकाल देताना म्हटलं की, कायद्याच्या हिशोबानं मृतदेहाला व्यक्ती मानता येत नाही. त्यामुळं बलात्काराशी संबंधित भादंवि कलम ३७६ आरोपीवर लागू होत नाही. कलम ३७५ आणि ३७७ अंतर्गत मृतदेहाला मनुष्य किंवा व्यक्ती मानता येणार नाही.

कोर्टानं भलेही आरोपीला बलात्कार प्रकरणात मुक्त केलं असेल पण केंद्र सरकारला निर्देश दिले की, त्यांना ६ महिन्यांमध्ये भादंवि कलम ३७७ मध्ये सुधारणा करावी तसेच माणसाचा आणि प्राण्यांच्या मृतदेहासोबत बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी शिक्षेची तरतूद करावी. हायकोर्टानं म्हटलं की, सरकारनं नेफ्रोफिलिया आणि मृतदेहांसोबत सेक्स करणं हा गुन्हा भादंवि कलम ३७७ अंतर्गत आणावा.

Karnataka high court
IND vs AUS: WTC फायनलमध्ये हा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग! शुभमन गिलचा पत्ता कट?

न्या. बी. वीरप्पा यांच्या अध्यक्षतेखालील हायकोर्टाच्या खंडपीठानं म्हटलं की, कलम ३७७ भलेही अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत भाष्य करत असलं तरी यामध्ये मृतदेहाचा समावेश होत नाही. महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केल्यास कलम ३७६ देखील लागू होत नाही.

पण तरीही कनिष्ठ कोर्टानं शिक्षा सुनावताना चूक केली. पण आता हायकोर्टानं आरोपी रंगराजू याला बलात्कार प्रकरणाच्या आरोपांतून मुक्त केलं. तसेच केंद्राला सहा महिन्यांच्या आत कायद्यात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.

Karnataka high court
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

नेफ्रोफिलिया काय आहे?

मृतदेहांबाबत लैंगिक आकर्षणाला नेफ्रोफिलिया म्हणतात. नेफ्रोफिलिया हा शब्द दोन ग्रीक शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. नेक्रो म्हणजे मृतदेह आणि फिलिया म्हणजे आकर्षण. नेफ्रोफिलिया ही एक मानसिक विकृती आहे.

यानं ग्रस्त असलेली व्यक्ती मृत शरीरांकडं आकर्षित होत असतात. तसेच मृतदेहांसोबत लैगिंक क्रिडा करतात. त्यामुळं या नेफ्रोफिलायनं पीडित व्यक्ती सिरियल किलर बनतो. नोएडामधील बहुचर्चित निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुरेंद्र कोळी हा देखील नेफ्रोफिलायानं ग्रस्त होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com