
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियरमुळे आलेला प्रलय सर्व जगाने पाहिला.
देहराडून- उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियरमुळे आलेला प्रलय सर्व जगाने पाहिला. बचावकार्य टीम घटनास्थळी आपले काम बजावत आहे. ITBP चे जवान रेस्क्यु अभियानात आघाडीवर आहेत. या टीमला लीड करत आहेत IPS अधिकारी अपर्णा कुमार. अपर्णा ITBP च्या डीआयजी आहेत. त्या २००२ कॅडरच्या आयपीएस अधिकारी असून कर्नाटकच्या रहिवाशी आहेत. त्यांनी BA-LLB चे शिक्षण घेतले आहे. त्यांचे पती संजय कुमार यूपी कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा
सर्वात उंच ७ शिखरांवर फडकावला झेंडा
अपर्णा कुमार यांनी जगातील सर्वाधिक उंच ७ शिखरांवर तिरंगा फडकावला आहे. त्या पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट किलिमंजारो, माउंट एल्ब्रुस, कार्सटेंस पिरामिड, विन्सन मैसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनाली सर केले आहेत. ही सर्व शिखरं ७ वेगवेगळ्या महाद्वीपात असून यांना ७ समिट्स म्हटलं जातं.
२००२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा बर्फाने आच्छादलेल्या शिखरांना पाहिलं होतं. त्यावेळी त्या मसुरीमध्ये अॅडमिनिस्ट्रेटिव सर्विसेसची ट्रेनिंग घेत होत्या. त्याचवेळी त्यांनी शिखरे सर करण्याचा निश्चय केला. या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी त्यांना ११ वर्ष लागली. त्यांनी २०१३ मध्ये माऊंटेनियर फाऊंडेशनचा कोर्स केला. तेव्हा त्यांचं वय ३९ होतं.
व्हायरस असलेलं अॅप गुगलने हटवलं; तुमच्याकडे असेल तर डिलिट करा
२०१४ पासून करतायहेत शिखरं सर
अपर्णा यांनी पहिल्यांदा माऊंटेनियरचा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये आफ्रीकेतील सर्वात उंच माऊंट किलीमंजारो (१९,३४० फूट) पादाक्रांत केले. त्याच वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि ओशिनियातील सर्वात उंच पर्वत कार्स्टेंस पिरामिड (16,024 फूट) सर केले. त्यानंतर पुढील वर्षी अर्जेंटीनातील सर्वात उंच माऊंट एकॉनकागुआ (22,840 फूट), रशियातील कोकेशियान रेंजमधील सर्वात उंच शिखर माऊंट एल्ब्रुस (18,510 फूट) यशस्वीपणे सर केले. २०१६ मध्ये अंटार्कटिकातील सर्वात उंच विन्सन मासिफ (16,050 फूट) सर केले. याच वर्षी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट सर केले.
दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली महिला
२०१७ मध्ये नेपाळमधील आठवे सर्वात उंच शिखर मानसालुवर अपर्णा यांनी तिरंगा फडकावला. दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अधिकारी ठरल्या आहेत. २०१९ मध्ये त्या मायनस ४० डिग्री तापमानाच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्या. २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या माऊंट डेनाली सर करुन ७ समिट्सवर चढाई करण्याचा विक्रम बनवला.