ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

टीम
Tuesday, 9 February 2021

वेबसाईटच्या माध्यमातून शर्मा यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली : हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा काम करत असलेल्या www.newsclick.inच्या ऑफिसवर आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. अभिसार शर्मा सध्या newsclickसाठी कन्सल्टिंग अँकर म्हणून काम करतात. शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून छाप्यांची माहिती दिली. वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या कार्यालयावर छापा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अभिसार शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून छाप्याची माहिती दिली आहे. ईडीने केवळ न्यूज क्लिकच्या ऑफिसवरच नव्हे तर, गुंतवणुकदारांच्या कार्यालयांवरही छापे टाकले असल्याचे शर्मा यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

कोण आहे अभिसार शर्मा?
अभिसार शर्मा यांनी एनडीटीव्ही, झी, एबीपी न्यूज यांसारख्या आघाडीच्या हिंदू न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकरपासून एडिटर या पदांवर काम केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कामाची दखलही घेण्यात आली असून, त्यांना दोनवेळा रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून, त्यांना हिंदी अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. 2017मध्ये त्यांना रेड इंक हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ed conducts raids abhisar sharma newsclick office