
एका आयपीएस अधिकाऱ्याने पोलीस शिपायाला बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते. या शिपायाने आयपीएस अधिकाऱ्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या सुनावणीवेळी निवृत्त झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याला कोर्टात उपस्थित रहावं लागलं. हायकोर्टानं आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात निर्णय दिला आणि पोलीस शिपायाच्या बडतर्फीला स्थगिती दिली. यात विशेष म्हणजे शिपायाकडून आयपीएस अधिकाऱ्याची मुलगीच हा खटला लढत होती.