
चेन्नईत महिला पोलिस कॉन्स्टेबल्सकडे शरीर सुखाची मागणी केल्याने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. हा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करुन दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करत होता. या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रार केल्यांतर या बड्या अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.