Y. Puran Kumar Case
esakal
पुरण कुमार यांच्यावर लाचखोरी प्रकरणात एफआयआर दाखल
दारू व्यावसायिकाचा व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे पोलिसांकडे सादर
कुटुंबाचा दावा: ही आत्महत्या नव्हती, दबावाखाली घडलेलं कृत्य
Y. Puran Kumar Case : हरियाणातील आयपीएस अधिकारी Y. Puran Kumar यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणात लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने त्यांनी आत्महत्या केली, की त्यांना आत्महत्येस भाग पाडण्यात आले, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे एफआयआरमध्ये त्यांचं नाव समाविष्ट असणं. सरकारी परवानगीशिवाय त्यांच्यावर एफआयआर (FIR) का दाखल झाला, यावरही शंका व्यक्त केली जात आहे.