
उत्तराखंड कॅडरच्या २०१५च्या बॅचच्या आयपीएस रचिता जुयाल यांनी अवघ्या १० वर्षाच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांकडे राजीनामा सोपवलाय. यावर आता केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल. दरम्यान, रचिता जुयाल यांच्या राजीनाम्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.