
सक्तवसुली संचालनालया म्हणजेच ईडीमध्ये अधिकारी म्हणून काम करताना दोन मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानं चर्चेत आलेल्या दिग्गज अधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय. कपिल राज असं अधिकाऱ्याचं नाव असून वयाच्या ४५ व्या वर्षीच १६ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. कपिल राज हे २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. कपिल राज हे ८ वर्षे ईडीमध्ये कार्यरत होते. त्यांनी मनी लाँड्रीग प्रकरणी दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली होती. याशिवाय नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणाचीही चौकशी केली होती.