Women refusing sex | पत्नीने लैंगिक संबंधांसाठी नकार द्यावा? भारतीय पुरुष म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

couple sleep
पत्नीने लैंगिक संबंधांसाठी नकार द्यावा? भारतीय पुरुष म्हणतात...

पत्नीने लैंगिक संबंधांसाठी नकार द्यावा? भारतीय पुरुष म्हणतात...

वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जावा की नाही, हा विषय सध्या तापलेला असतानाच दुसरीकडे एका सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (National Family Health Survey) समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी थकलेली असेल तर तिने आपल्या पतीला लैंगिक संबंधांसाठी नाही म्हणणं योग्यच आहे, असं बहुतांश पुरुषांचं मत आहे.

तर ८० टक्के महिलांना असं वाटतं की खालील कारणांमुळे आपल्या पतीला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी नकार देणं योग्यच आहे -

  • जर पतीला लैंगिक संबंधांतून होणारे आजार असतील

  • जर पतीने दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध प्रस्थापित केले असतील

  • जर महिलांना लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा नसेल किंवा ती थकलेली असेल.

या तीन कारणांसाठी महिलेने लैंगिक संबंधांसाठी नकार देणं योग्य आहे, असं ६६ टक्के पुरुषांचं म्हणणं आहे. (It is okay for wife to refuse sex says indian men)

हेही वाचा: घरगुती हिंसाचार महिलांनाच मान्य; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

मात्र अजूनही ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरुषांना असं वाटतं की कोणत्याही कारणाने पत्नीने पतीला लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नकार देऊ नये. महिला सक्षमीकरणाविषयी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातल्या 'पतीसोबत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याप्रती दृष्टिकोन' या भागामध्ये हे सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात लिंगसमानतेच्या दृष्टिकोनातून संमतीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्री- पुरुष दोघेही १५ ते ४९ या वयोगटातले होते. २०१५-१६ साली याच विषयावर झालेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत, पतीला कोणत्याही कारणाने लैंगिक संबंधांसाठी नकार देण्याचा हक्क महिलांना आहे, हे मानणाऱ्या स्त्रियांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली असून पुरुषांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: Is It Okay For Wife To Refuse Sex See What Indian Men Says

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top