Terrorist Leader : इराक आणि अमेरिकी लष्कराच्या संयुक्त कारवाईत आयसीस दहशतवादी संघटनेचा नेता अबू खादिजा ठार झाला आहे. याला इराकचे पंतप्रधान मोहंमद शिया अल-सुदानी यांनी दुजोरा दिला आहे.
बगदाद : इराक आणि अमेरिकी लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू खादिजा ठार झाला आहे . इराकचे पंतप्रधान मोहंमद शिया अल-सुदानी यांनी याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालीच हा कारवाई करण्यात आली.