ISKCON: इस्कॉन आपल्या गौशाळेतील गाई कत्तलखान्यात विकत आहे; मनेका गांधींच्या आरोपानंतर धार्मिक संस्थेकडून उत्तर

 ISKCON meneka gandhi
ISKCON meneka gandhi

नवी दिल्ली- इस्कॉन The International Society for Krishna Consciousness (ISKCON) ही धार्मिक संस्था मोठी फसवणूक करत असून त्यांच्या गौशाळेतील गाई कत्तलखान्यात विकल्या जातात, असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केला होता. या गंभीर आरोपनंतर इस्कॉनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

कृष्णभक्ती करणारी इस्कॉन ही जगातील सर्वात मोठी धार्मिक संस्था आहे. देशातच नाही तर परदेशातही इस्कॉनने मोठ्या प्रमाणात कृष्ण भक्तीचा प्रसार केला आहे. मनेका गांधी यांच्याकडून झालेल्या गंभीर आरोपानंतर इस्कॉनच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. इस्कॉनवर झालेले आरोप खोटे आणि कोणत्याही आधाराशीवाय केलेले आहेत, असं सस्थेचे प्रवक्ते युदिष्ठिर गोविंदा दास यांनी म्हटलंय.

 ISKCON meneka gandhi
आंतरराष्ट्रीय पातळीवरही चौकशी करा! मुनगंटीवार यांचे मेनका गांधी यांना थेट आव्हान 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी प्राणी संरक्षण चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी याआधीही अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, 'इस्कॉन ही देशातील सगळ्यात मोठी फसवणूक संस्था आहे. ते गौशाळा चालवतात आणि सरकारकडून मदत मिळवतात. त्यांनी सरकारकडून मोठी जमीनही घेतली आहे.' एका व्हिडिओत त्या हे बोलताना दिसत आहेत.

मनेका गांधी म्हणाल्या की, 'मी आंध्रा प्रदेशातील इस्कॉनच्या अनंतपूर गौशाळेला भेट दिली.तेथे मला दूध न देणारी एकही गाय दिसली नाही. संपूर्ण गौशाळेत अशी एकही गाय नव्हती. याचा अर्थ सर्व गाई विकण्यात आल्या आहेत. इक्सॉन या गाई कत्तलखान्यात विकत आहे. त्यांच्या इतकं मोठ्या प्रमाणात असं दुसरं कोणीही करत नाही.'

 ISKCON meneka gandhi
'मेनका गांधी भाजप खासदार असल्याची लाज वाटतेय'

घृणास्पद ते कार्य करतात. दुसरीकडे ते रस्त्यावर हरे रामा, हरे कृष्णा गात असतात. ते म्हणतात त्यांचं संपूर्ण आयुष्य दूधावर अवबंलून आहे. त्यांच्या इतक्या गाई दुसरे कोणीही विकल्या नसतील, असं आरोप त्यांनी केलाय.

इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणाले की, 'आमच्याकडून गाय आणि बैल या दोघांची काळजी घेतली जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी देशात आणि विदेशातही कटिबद्ध आहोत. गाय आणि बैल यांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपवणूक केली जाते. त्यांना कत्तलखान्यात दिले जात नाही.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com