esakal | ६ कोटीला बेट विक्रीस... 
sakal

बोलून बातमी शोधा

६ कोटीला बेट विक्रीस... 

मुंबईच्या उच्चभ्रू भागात तर सहा कोटीला प्रशस्त फ्लॅटही मिळणे कठीण झाले असताना एक संपूर्ण बेटच 6 कोटीला मिळत आहे.

६ कोटीला बेट विक्रीस... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॅार्क : घरांच्या किमती आभाळाला पोचल्या आहेत. जगभरात रिअल इस्टेटचे दर वाढतच आहेत... मुंबईदेखील त्याच रांगेत आहे. मुंबईच्या उच्चभ्रू भागात तर सहा कोटीला प्रशस्त फ्लॅटही मिळणे कठीण झाले आहे. मात्र अमेरिकेत सहा कोटीला एक बेट विक्रीस काढले आहे. त्याच्या या किमतीचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

अमेरिकेतील मॅनहाटन शहरापासून अवघ्या 60 किमीच्या अंतरावर एका घराच्या किंमतीत एक संपूर्ण बेट विक्रिस आहे. एकमेव बंगला असलेले हे बेट 8 लाख 50 हजार डॅालर्सना (सुमारे 6 कोटी रूपये) या किंमतीत विक्रीस आले आहे.

न्यू फेयरफिल्ड या मुख्य शहरापासून बोटीने 10 मिनीटांचा प्रवास केल्यानंतर या बेटाजवळ पोहचता येते. विलो असे या बेटाचे नाव असून वृक्षांनी बहरलेल्या बेटावर एक सर्व सोयी-सुविंधायुक्त एक भव्य असा बंगला आहे. सण1932 मध्ये बांधलेल्या या 1922 चौरस फूट बंगल्यात 4 बेडरूमसह सुमारे 35 खिडक्या आहेत. तसेच या बंगल्यासोबत एक गॅरेज देखील देण्यात आले असून या व्यतीरिक्त 600 चौरस फूटाची योगा आणि इतर मैदानी उपक्रमांसाठी उपलब्ध आहे. 
   

loading image
go to top