
रांची : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २०४० पर्यंत चांद्रभूमीवर मानव उतरविण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्याहीआधी २०२७ मध्ये ‘गगनयान’ ही मानवाचा समावेश असलेली मोहीम आखण्यात आली असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या ३५ व्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. अवकाश स्थानकाच्या उभारणीच्या अनुषंगाने देखील वेगाने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘इस्रो’कडून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू असून अनेक मोठ्या सुधारणाही घडवून आणल्या जात आहेत.