गौरवास्पद! इस्रोने 1975 पासून अंतराळात सोडले 129 उपग्रह

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची राज्यसभेत माहिती.
इस्रोची
इस्रोची

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 1975 पासून एकूण 129 भारतीय बनावटीचे उपग्रह (Satellites) अंतराळत सोडले आहेत, तर 36 देशांचे मिळून 342 परदेशी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (I/C) जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, आज भारताचे अवकाशात एकूण 53 उपग्रह कार्यरत आहेत. यापैकी २१ उपग्रह हे कम्युनिकेश, ८ नेव्हिगेशन उपग्रह, पृथ्वीचे निरीक्षण करणारे २१ उपग्रह तर ३ उपग्रह हे सायन्स उपग्रह असल्याचे सिंह यांनी सांगितले.(ISRO Launched Total 129 Satellites Of Indian Origin Since 1975)

ऑपरेशनल ऍप्लिकेशन्समध्ये आणखी वाढ करण्यासाठी आणि देशातील उदयोन्मुख ऍप्लिकेशन्स आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इस्त्रोची अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे. आज भारताचे अवकाशात एकूण 53 उपग्रह कार्यरत आहेत. यापैकी २१ उपग्रह हे कम्युनिकेश, ८ नेव्हिगेशन उपग्रह, पृथ्वीचे निरीक्षण करणारे २१ उपग्रह तर ३ उपग्रह हे सायन्स उपग्रह असल्याची माहिती सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

इस्रोची
महाराष्ट्र मास्क मुक्त संदर्भात आरोग्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

सिंग म्हणले की, उपग्रह सक्षम डेटा आणि सेवांचा वापर देशातील विविध क्षेत्रांच्या फायद्यासाठी केला जात आहे. यामध्ये टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, डायरेक्ट-टू-होम, एटीएम, मोबाईल कम्युनिकेशन, टेली-एज्युकेशन, टेली-मेडिसिन आणि हवामान, कृषी-हवामानशास्त्रसंबधीचे उपग्रहांचा समावेश आहे. पीक उत्पादन अंदाज, पीक तीव्रता, आणि कृषी दुष्काळ मूल्यांकन, पडीक जमिनीची यादी, भूजल संभाव्य क्षेत्रे ओळखणे, अंतर्देशीय जलसंवर्धनासाठी उपयुक्तता आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी उपग्रहाकडून मिळालेल्या डेटा वापरला जात असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.

इस्रोची
अजित पवारांची हिजाब प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले काही लोक...

चांद्रयान-3 मोहिम ऑगस्ट महिन्यात

इस्रोची 2019 च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यांदरम्यान चांद्रयान-2 मोहिम पार पडली होती. मात्र, इस्त्रोला या मोहिमेत अपयश आले होते. आता चांद्रया-3 मोहिम ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना आणि इतर निर्बंधांमुळे इस्त्रोच्या अनेक मोहिमा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता या मोहिमा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. २०२२ मध्ये इस्रोने तब्बल 19 मोहिमा हाती घेतल्या आहेत, अशी माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत लेखी उत्तरात देण्यात आली होती. विशेष म्हणजे बहुचर्चित चांद्रयान-३ ( Chandrayaan-3 ) मोहिम ही याच वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com