ISRO launches pslv c55 with 2 Singaporean satellites with TeLEOS-2 and LUMELITE-4  satellites
ISRO launches pslv c55 with 2 Singaporean satellites with TeLEOS-2 and LUMELITE-4 satellites

ISRO : इस्रोने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह, जाणून घ्या काय आहे खास

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने PSLV-C55 रॉकेटद्वारे शनिवारी दुपारी सिंगापूरचे दोन उपग्रह TeleOS-2 आणि LumiLite-4 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहचवण्यात आले. POEM देखील या दोन उपग्रहांसोबत उड्डाण करेल. POEM स्पेसच्या व्हॅक्यूममध्ये काही चाचण्या करेल. पीएसएलव्हीचे हे 57 वे उड्डाण होते.

या मिशनला TeleOS-2 मिशन असे नाव देण्यात आले आहे. या प्रक्षेपणामुळे, कक्षेत पाठवलेल्या एकूण परदेशी उपग्रहांची संख्या 424 झाली आहे.

POEM म्हणजे काय?

POEM चे पूर्ण रूप PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल आहे. PSLV हे चार टप्प्यातील रॉकेट आहे. त्याचे तीन टप्पे समुद्रात पडतात. शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा, ज्याला PS4 असेही म्हणतात, उपग्रह त्याच्या कक्षेत पोहोचल्यानंतर, अवकशातच पडून राहते. आता यावर प्रयोग करण्यासाठी POEM चा वापर केला जाईल. हे चौथ्यांदा करण्यात येत आहे.

ISRO launches pslv c55 with 2 Singaporean satellites with TeLEOS-2 and LUMELITE-4  satellites
Jammu Kashmir Terror Attack : कारगिल युध्दात पिता, मुलाचं पूंछमध्ये बलिदान; आईला म्हणाला होता…

Lumilite-4 काय आहे

सिंगापूरच्या इन्फोकॉम रिसर्च इंस्टीट्युट आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर च्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आणि रिसर्च सेंटरच्या भागीदारीत तयार केले गेले. सिंगापूरची ई-नेव्हिगेशन सागरी सुरक्षा वाढवणे आणि जागतिक शिपिंग कम्युनिटीला फायदा मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. याचे वजन 16 किलो आहे.

ISRO launches pslv c55 with 2 Singaporean satellites with TeLEOS-2 and LUMELITE-4  satellites
Viral Video : सामन्यानंतर भरली धोनी मास्तरांची शाळा; हैद्राबादच्या खेळाडूंनी घेतलं ज्ञान

TeleOS-2 काय आहे

हा एक टेली कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. सिंगापूर सरकारने तेथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तयारी केला आह. त्याचे वजन 741 किलो आहे. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com