अभिनंदन! कोरोनाच्या संकटातही इस्रोची यशस्वी झेप; प्रमुखांनी केलं शास्त्रज्ञांचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून झालेल्या प्रक्षेपणात 9 आंतरराष्ट्रीय तर एक भारतीय सॅटेलाइट सोडण्यात आलं. भारताचे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट (EOS-01) यशस्वीपणे लाँच झाल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली.

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 च्या माध्यमातून 10 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून झालेल्या प्रक्षेपणात 9 आंतरराष्ट्रीय तर एक भारतीय सॅटेलाइट सोडण्यात आलं. भारताचे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट (EOS-01) यशस्वीपणे लाँच झाल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली.

कोरोनाच्या काळात य़शस्वीपणे कामगिरी केल्याबद्दल के सिवन यांनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले. कोरोनाचं संकट असताना हे कऱणं खूप कठीण होतं. अंतराळात सॅटेलाइट सोडण्याचं काम हे वर्क फ्रॉम होम करता येणारं नव्हतं. त्यासाठी प्रत्येक अभियंत्याला लॅबमध्ये येणं आवश्यक होतं. महामारी असताना नियमावली पाळून काम केलं. हे करत असताना क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही असंही इस्रो प्रमुखांनी नमूद केलं. 

हे वाचा - मागील आठ वर्षांत देशभरातून तब्बल 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड्स रद्द

EOS-01 हे सॅटेलाईट 'अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट' (Earth observation satellite )आहे. पृथ्वीवर लक्ष ठेवणारे सॅटेलाईट आहे.  या सॅटेलाईटद्वारे शेती, जंगल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे. ISRO ने म्हटलं होतं की, इतर आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे सॅटेलाईट्स हे न्यूस्पेस इंडिया लिमिटेट यांच्यासोबत झालेल्या व्यावसायिक कराराअतंर्गत सोडण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: isro successfully launch earth observation sattellitie