बंगळूर : "गगनयान' मोहिमेसाठी भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण आणि इतर साह्य करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) रशियातील ग्लाव्हकॉसमॉस या कंपनीबरोबर करार केला आहे. ग्लाव्हकॉसमॉस ही रशियातील प्रक्षेपण सेवा पुरविणारी संस्था असून, ती रशियाची अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉसशी संलग्न आहे.
ग्लाव्हकॉसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, ही संस्था "इस्रो'ला "गगनयान' मोहिमेसाठी अवकाशवीरांची निवड करण्यास, त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यास आणि अवकाश उड्डाणासंदर्भात प्रशिक्षण देणार आहे. मानवाला अवकाशात घेऊन जाणारी "गगनयान' ही भारताची पहिली मोहीम असेल. या मोहिमेसाठी "इस्रो'ने "ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारले असून, येथेच अवकाशवीरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डिसेंबर 2021 मध्ये "गगनयान' उड्डाण करण्याचे नियोजन असून, या मोहिमेतील संभाव्य तीन अवकाशवीरांमध्ये एक महिला असण्याची शक्यता आहे. या मोहिमेसाठीचे प्राथमिक प्रशिक्षण भारतातच होणार असून, पुढील प्रशिक्षण विदेशात होणार आहे, असे "इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने 9,023 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.