हलगा मच्छे बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा अटक

मिलिंद देसाई
शुक्रवार, 17 मे 2019

बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. 

बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. 

हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर करून बायपास रस्ता करण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवारात असलेल्या भाजीपाला आणि इतर पिकातून जेसीबी घालून रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी शेती बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा  सर्वेक्षण करण्यात येईल असे सांगत दोन दिवस काम बंद ठेवण्यात आले होते, मात्र पुन्हा तीव्र गतीने काम सुरू करण्यात आले. एकाचवेळी अधिक प्रमाणात मशिनी लावून काम केले जात आहे.

आज सकाळी शहापूर शिवारात काम सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी अटक केली. यामध्ये रयत गल्ली वडगाव येथील भोमेश बिर्जे, निलम बिर्जे, तानाजी हलगेकर, शेतकरी नेते प्रकाश नायक, पिंटू कंग्राळकर यांचा समावेश आहे. अटक केलेल्या शेतकऱ्यांना कोणत्या पोलिस स्थानकात ठेवले आहे. याबाबत पोलीस माहितीही देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता उद्या (शनिवारी) पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Halga Mache bypass road farmers arrested