#IStandwithAnuragKashyap अनुरागने 'हा' डायलॉग खरा करून दाखवला!

टीम ईसकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

काल (ता. 6) संध्याकाळी जेएनयूमधील घटनेचा निषेध म्हणून बॉलिवूड कलाकार व दिग्दर्शकांनी निषेध केला. यातही अनुराग हिरीरीने पुढे दिसला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हणामारीविरोधात देशभरातून विरोध होतोय. यात बॉलिवूड कलाकारही आक्रमकपणे पुढे दिसतात. अशातच, काल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत पुन्हा चर्चेला विषय जिला आहे. यामुळेच ट्विटरवर #IStandwithAnuragKashyap हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

अमित शहा हा तु्मचा जोडधंदा आहे का? अनुराग कश्यप यांचा गृहमंत्र्यांना टोला

 

अनुरागने अमित शाह यांना एका अश्लील ट्विटवरुन 'हा तुमचा जोडधंदा आहे का?' असा प्रश्न ट्विट करत विचारला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या मोहिमेवरुन भाजपची चांगली खिल्ली उडवली जात आहे. यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही उडी घेत थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनाच प्रश्न केला आहे.

अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातला 'तेरी कहके लूंगा' हा डयलॉग खरा करून दाखवलाय. तो सध्या सरकारवर भारी पडतोय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 

 

तसेच काल (ता. 6) संध्याकाळी जेएनयूमधील घटनेचा निषेध म्हणून बॉलिवूड कलाकार व दिग्दर्शकांनी निषेध केला. यातही अनुराग हिरीरीने पुढे दिसला. अनुरागसोबत या आंदोलनात दिया मिर्झा, तापसी पन्नू, झोया अख्तर व इतर कलाकार होते. नेटकरी म्हणत आहेत की अनुराग आम्हाला तुझा अभिमान आहे, या आंदोलनात आम्ही तुझ्यासोबत आहोत.   

 

 

देशभरातून या आंदोलनाविरूद्ध निषेध केला जातोय. मुंबई, हैदराबाद, लखनौ, बंगळूर अशा मुख्य शहरांमध्ये विद्यार्थी या घटनाचा निषेध करताना दिसतायत. याचेच पडसाद आता सोशल मीडियावरही दिसू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IStandwithAnuragKashyap hashtag trending on twitter related to JNU violence