संबित पात्रांच्या पोस्टवरील टॅगमुळे केंद्र सरकार नाराज; ट्विटरला सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanbit patra

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांच्या टूलकिटच्या ट्विटला मॅन्युप्लेटेड मीडिया म्हणजे दिशाभूल करणारी पोस्ट ठरवण्यात आलं होतं. यावरुन केंद्र सरकारने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.

संबित पात्रांच्या पोस्टवरील टॅगमुळे केंद्राने ट्विटरला सुनावलं

नवी दिल्ली- भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांच्या टूलकिटच्या ट्विटला मॅन्युप्लेटेड मीडिया म्हणजे दिशाभूल करणारी पोस्ट ठरवण्यात आलं होतं. यावरुन केंद्र सरकारने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपनीला पत्र लिहून यावर आक्षेप घेतला आहे. सरकारने ट्विटर कंपनीला सांगितलंय की, त्यांनी अशाप्रकारचा टॅग काढून टाकावा. समानता आणि बिगर पक्षपाती भूमिकेचे वातावरण आणि समान संधीसाठी हे आवश्यक आहे. सरकारकडून ट्विटरला सांगण्यात आलंय की, त्यांची भूमिका एक माध्यम म्हणून आहे आणि त्यामुळे कंपनीने निर्णय घेण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा आहे. (it ministry strongly reacts twitter on manipulated tag on sambit patra tweet tookit)

आयटी मंत्रालयाकडून पत्र लिहून सांगण्यात आलंय की, टूलकिट प्रकरणी संबंधित पक्षाकडून तक्रार करण्यात आली आहे आणि कायदेशीर संस्था याचा तपास करत आहेत. अशात ट्विटरकडून एखादा निर्णय घेणे चुकीचे आहे. सरकारने ट्विटरने उचलेल्या पाऊलाला पूर्वग्रहदुषित आणि जाणूनबुजून केलं जात असलेलं राजकारण ठरवलं आहे. मंत्रालय कंपनीच्या निर्णयाला एकतर्फी आणि योग्य प्रक्रियेला प्रभावित करणार ठरवते. हे आपल्या अधिकाऱ्याच्या बाहेर जाण्यासारखं आहे, हे स्वीकार केले जाऊ शकत नाही.

हेही वाचा: 'डोन्ट वरी! कोरोना सर्दी-खोकल्यासारखाच होणार सामान्य'

असे असले तरी केंद्र सरकारने स्पष्टपणे संबित पात्रा यांच्या ट्विटवर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख केला नाही. पण, पत्रात स्पष्टपणे जाणवतं की, भाजप प्रवक्ताच्या ट्विटसंबंधीच चर्चा करण्यात आली आहे. संबित पात्रा यांनी 18 मेला एक ट्विट केलं होतं. ज्यात काँग्रेसचं लेटरहेड होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, सोशल मीडियावर अशाप्रकारचे ट्विट आणि माहिती शेअर केली आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर आरोप केला होता की, कथित टूलकिटच्या मदतीने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे

संबित पात्रा यांनी १८ मे रोजी #CongrssToolkitExposed या हॅशटॅगसह टि्वट पोस्ट केले होते. जे अनेक भाजपा नेत्यांनी शेअर केले. "मित्रांनो काँग्रेसच्या टूलकिटकडे लक्ष द्या. कोरोना साथीच्या काळात गरजवंतांना मदत केल्याचं दाखवत आहेत. पण मित्र पत्रकार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने हा पीआर अभ्यास जास्त वाटतो. काँग्रेसचा अजेंडा तुम्ही वाचा #CongressToolKitExposed" असे लिहून कागदपत्रांचे स्क्रिनशॉट शेअर केले होते. याप्रकरणी काँग्रेसने टूलकिटचे आरोप खोटे असल्याचं म्हणत तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ

मॅन्युप्लेटेड मीडिया म्हणजे काय?

एखादी पोस्ट दिशाभूल करणारी असेल, तर ट्विटर याला अशाप्रकारचा टॅग देते. अमेरिकी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला मॅन्युप्लेटेड मीडिया टॅग देण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.

loading image
go to top