तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

कोरोनाची (corona virus) संभाव्य तिसरी लाट देशाच्या राजधानीच्या उंबरठ्यावर आल्याचे संकेत मिळाले आहेत

तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोनाची (corona virus) संभाव्य तिसरी लाट देशाच्या राजधानीच्या उंबरठ्यावर आल्याचे संकेत मिळाले आहेत. दिल्लीत दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरण्याचे वृत्त असतानाच, गेल्या काही दिवसात लोकनायक जयप्रकाश कोरोना रूग्णालयात दाखल झालेल्या ० ते १५ वयोगटातील बालरुग्णांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेने तब्बल चौपटीने वाढ झाली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (corona virus spreading in child delhi news covid19 patients)

लोकनायक रूग्णालयात पहिल्या व दुसऱया लाटेच्या प्रारंभीदेखील मुलांचे प्रमाण कमी होते. मात्र गेल्या दीड ते २ महिन्यांत कोरोनाग्रस्त मुलांना घेऊन येणाऱ्या धास्तावलेल्या पालकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या काळात दिल्लीतील या एका रूग्णालयात किमान २९ कोरोनाग्रस्त मुले उपचारांसाठी भरती झाली. पहिल्या लाटेत, मागील वर्षी हे प्रमाण ६ ते ७ इतके होते व त्यातील बहुतांश मुलांनी कोरोनाला हरवले होते. यंदा मात्र कोरोना वॅार्डात दाखल झालेल्या मुलांना अनेक दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेऊनही हवा तेवढा गुण येताना दिसत नसल्याने डॉक्टरांची काळजी वाढली आहे. येथील बालकांच्या वॉर्डातील १२ व्हेंटिलेटर भरलेले आहेत. मात्र हा तिसऱ्या लाटेचाच परिणाम आहे किंवा कसे, याबद्दल अधिकृतरीत्या सांगण्यात आलेले नाही. ताप, जुलाब, न्यूमोनिया व चिडचिडेपणा ही मुलांना कोरोना संक्रमण झाल्याची प्रारंभिक लक्षणे सांगितली जातात. जयप्रकाश रुग्णालयांतील घटनेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पातळीवरून या मुलांच्या उपचारांबद्दल विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: टि्वटरने संबित पात्रांच्या टि्वटला ठरवलं 'हेरा-फेरी मीडिया'

बालरोगतज्ञांची विशेष समिती स्थापन

एका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीच्या कोरोना लाटेत ६ वर्षाखालील मुलांच्या सरसकट चाचण्याही करण्यात आल्या नव्हत्या. कारण मुलांमध्ये तेव्हा कोरोनाची लक्षणे आढळली नव्हती. मात्र यंदा दुसऱ्या लाटेत संक्रमित लहान मुलांची संख्या दिल्लीत एकाएकी वाढू लागली, हे काळजीचे कारण ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेने मान्य केले. बालरोगतज्ञांची १५ जणांची विशेष समिती स्थापन करण्यात आली असून कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती लोकनायक जयप्रकाश रूग्णालयाचे संचालक सुरेश कुमार यांनी दिली.

loading image
go to top