हुडहुडी भरली म्हणून चक्क बकऱ्याला घातला स्वेटर

अशोक मुरुमकर
Friday, 6 November 2020

राज्यात थंडीची हुडहुडी वाढू लागले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. सायंकाळी आणि सकाळी रिक्षा किंवा गाडीवर जाताना गारवा लागतो.

अहमदनगर : राज्यात थंडीची हुडहुडी वाढू लागले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. सायंकाळी आणि सकाळी रिक्षा किंवा गाडीवर जाताना गारवा लागतो.

यापासून बचाव व्हावा म्हणून काहीजण कानपट्टी वापरताना दिसत आहेत. सकाळी मॉर्निग वॉकला जाताना अनेकजण उबदार कपडे वापरताना दिसत आहेत. अशातच सध्या एका बकऱ्याला स्वेटर घातल्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर झाला आहे.

प्राण्यांना हौस म्हणून अनेकजण कपडे घालतात. पण ऐन थंडीच्या वेळी त्यांना हुडहुडी भरत असेल का? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. पाऊस आला तर ते प्राणी निवारा शोधतात. पण थंडीच्या काळात त्यांचे अवघड होते. ऑक्टोबर संपून नोव्होबर सुरु होताच थंडी सुरु झाली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत आहे. माणसांप्रमाणेच देवांनाही शाल आणि उबदार कपडे चढवल्याचे आपण पाहिले आहे. पण बऱ्याचदा प्राणी थंडीत कुडकुडत राहतात. या प्राण्यांना देखील उब मिळण्याची गरज आहे हे सांगणारा एक फोटो सध्या चर्चेत आला आहे.

दिपांशू काब्रा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. थंडी त्यांनाही वाजते फक्त ते बोलू शकत नाहीत, असं कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बकरीमध्ये स्वेटर घातल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टला ५८३ जणांनी लाईक केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was cold in Maharashtra in November