काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जावे- कुमारस्वामी

It Would Be Much Easier For The Congress To Alliance With Bjp Than Shiv Sena says Hd Kumaraswamy
It Would Be Much Easier For The Congress To Alliance With Bjp Than Shiv Sena says Hd Kumaraswamy

बंगळुरु : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, तुलनेत भाजपचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबतच जावे असे, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना कुमारस्वामी यांनी काँग्रेसला भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेच्या निर्णयाबरोबरच सत्तेचं सूत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, जहाल हिंदुत्वादी विचारांच्या पक्षाशी जुळवून घेताना काँग्रेस अस्थिर होते. त्यापेक्षा काँग्रेसनं मवाळ हिंदुत्ववादाचा स्वीकार करणाऱ्या भाजपासोबत जाणं कधीही सोयीचे आहे. तीन पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यापेक्षा काँग्रेस भाजपसोबत जाण्याचा पुनर्विचार करेल की नाही, मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कर्नाटकात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात? राष्ट्रवादीकडून पुरावा सादर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, शिवसेनेनं स्वतंत्र भूमिका घेतल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. भाजप, राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. तर शिवसेनेनं सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. राज्यपालांनी अधिक वेळ देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट असून, सरकार कधी स्थापन होणार हे कोणीच सांगू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com