आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात? राष्ट्रवादीकडून पुरावा सादर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते.

मुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आव्हाडांच्या या विधानानंतर ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटरवर एक फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यात आशिष शेलार एका मांत्रिकासोबत असल्याचा दावा केला आहे. त्याला पुरावा म्हणून लिहिण्यात आलं आहे. मात्र, हा फोटो कधीचा आहे, किंवा शेलारांसोबत असलेला व्यक्ती मांत्रिक आहे का? याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

भाजपला वाटते शरद पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे

पाऊस मुख्यमंत्र्यांनाही घेऊन गेला; राष्ट्रवादीच्या बैठकीत मी पुन्हा येईनची चर्चा

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला आहे. राज्यात 105 जागा जिंकूनही हतबल असलेल्या भाजपने संजय राऊत यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी एक विधान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी रोज एकपात्री वगनाटयाचा प्रयोग सुरू आहे. संजय राउत यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितले होते. त्याचसोबत मोदी आणि बाळासाहेबांचे एक खास नाते असल्याचे सांगताना शेलारांनी हा टोला शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत असल्याचं चित्र असल्याने विरोधकांनाही होताच त्यामुळे शेलारांना जितेंद्र आव्हाडांनी मांत्रिकाच्या संपर्कात असल्याच्या टोला लगावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar in touch with mantrik? NCP tweeted a photo For proof