हाडे गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवान करत आहेत योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या हिमालयात १५ हजार फूट उंचीवरील बर्फात हिमवीरांनी योगासने सादर केली
ITBP yoga
ITBP yogagoogle

मुंबई : उत्तराखंडमधील हिमालयात १५ हजार फूट उंचीवर Indo-Tibetan Border Police (ITBP) यांनी योगासने सादर केली. याची चित्रफीत ITBPतर्फे ट्विटरवर शेअर करण्यात आली. "येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या हिमालयात १५ हजार फूट उंचीवरील बर्फात हिमवीरांनी योगासने सादर केली", असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी ITBPतर्फे विशाखापट्टणम आणि लडाख येथेही योगासनांचे सत्र आयोजित करण्यात आले होते. याची चित्रफीत प्रसारित करताना "अमृत महोत्सवी वर्षातील योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणमच्या भिमल्ली समुद्र किनाऱ्यावर 56th Battalion ITBPच्या हिमवीरांनी योगासने सादर केली" असे म्हटले आहे.

लडाखमधील १५ हजार फुटांवरील योग सत्राची चित्रफीतही ट्विट करण्यात आली आहे.

बिहारच्या छपरा येथे २७ एप्रिलला योगासनांचे सत्र आयोजित करण्यात आले होते.

२०१५ सालापासून २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित केला जातो. या दिवशी नागरिक विविध ठिकाणी एकत्र येत योगासने सादर करतात. याचप्रमाणे देशाच्या विविध भागांत तैनात असलेले सैनिकही योगासने सादर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com