दिलासा! ITR भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या नवी तारीख

यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती.
Now fill ITR on app!
Now fill ITR on app!

नवी दिल्ली : Income Tax Return Assessment Year 2021-22 : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्याचा निर्णय सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (CBDT) घेतला आहे. त्यानुसार, आता ITR भरण्याची नवी अंतिम तारीख १५ मार्च असेल. त्यामुळं ज्या करदात्यांनी अद्याप ITR फाईल केलेला नाही त्यांना दिलासा मिळाला आहे. (ITR filing deadline for Assessment Year 2021 22 extended till March 15 CBDT)

CBDTनं का वाढवली तारीख?

ITRची तारीख पुन्हा वाढवण्यामागचं कारण सांगताना CBDTनं सांगितलं की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं करदात्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळंच ITR फाईलिंगची तारीख पुन्हा वाढवण्यात आली आहे. CBDTनं आपल्या नोटिफिकेशनमध्ये असंही म्हटलं की, इन्कम टॅक्स कायदा १९६१ च्या तरतुदींनुसार विविध ऑडिट रिपोर्ट्ससाठी ई-फाईलिंगदरम्यान येत असलेल्या समस्यांमुळं देखील डेडलाईन वाढवण्यात आली आहे.

ऑनलाईन ITR कसं फाईल कराल?

  1. अधिकृत इन्कम टॅक्स पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ला भेट द्या. तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर जा आणि ई-फाइलवर क्लिक करा, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न या ऑप्शनवर जावा आणि फाइल आयकर रिटर्नवर क्लिक करा.

  2. 2021-22 हे वर्ष असेसमेंट इयर म्हणून निवडा आणि Continue वर क्लिक करा. फाइलिंग मोड म्हणून ऑनलाइन हा निवडा आणि प्रोसिड वर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही आधीच इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल आणि ते सबमिशनसाठी पेंडिंग असेल, तर Resume Filing वर क्लिक करा.

  3. तुम्ही सेव्ह केलेले रिटर्न डिस्कार्ड करुन नवीन रिटर्न्स तयार करायचे असतील तर स्टार्ट न्यु फाइलिंग वर क्लिक करा, तुम्हाला लागू होणारे राज्य निवडा आणि पुढे जाण्यासाठी Continue वर क्लिक करा.

  4. तुमच्या प्राप्तिकर रिटर्नचा प्रकार निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत: तुम्हाला कोणता ITR फाइल करायचा आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही'हेल्प मी डिसाइड विच आईटीआर फॉर्म टू फाइल' हा पर्याय निवडा आणि Continue वर क्लिक करा. जेव्हा सिस्टम तुम्हाला योग्य ITR सेट करण्यास मदत करेल, आणि तुम्ही तुमचा ITR फाइल करु शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com