पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 6 जवान जखमी

वृत्तसंस्था
Friday, 3 April 2020

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.

श्रीनगर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना पाकिस्तान सीमेवर गोळीबार करत आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुदंरबनी परिसरात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत 6 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 4 जवान आणि 2 बीएसएफचे जवान आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ix soldier injured on loc firing at rajouri unprovoked firing by the pakistan army