Jammu Kashmir: कुपवाडात एलओसीवर धुमश्चक्री; 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.
Jammu Kashmir
Jammu Kashmir

कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा इथं लाईन ऑफ कन्ट्रोलवर (LOC) भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये समोरासमोर जोदार धुमश्चक्री झाली. यामध्ये जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ठार झालेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीर गझनवी फोर्स (JKGF) या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असताना ही चकमक झाली. (J & K Indian security forces neutralize 5 foreign terrorists infiltrating in Kupwara through LoC)

या दहशतवाद्यांनी अफगाण-पाक भागात लपून छपून कारवाया केल्या आहेत. गुरुवारी रात्री हे लोक कुपवाडा जिल्ह्यातील जुमागंड इथून भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत होते. हे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांना विशेष खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार लष्करानं त्यांना घेरण्यासाठी खास रणनीती तयार केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून मोठी चकमक झाली. (Marathi Tajya Batmya)

Jammu Kashmir
Mumbai Crime: नवऱ्यानं बायकोला पेट्रोल टाकून भररस्त्यात पेटवलं! रिक्षावाल्यानं वाचवले प्राण

चकमक यशस्वी

भारतीय जवानांकडून या चकमकीला यशस्वीरित्या हाताळले गेले कारण यात एकही जवान जखमी झालेला नाही, उलट त्यांनी या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरुवारी रात्री ही मोहिम सुरु करण्यात आली होती जी शुक्रवारी सकाळी संपली, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest Marathi News)

Jammu Kashmir
Mira Road Murder: सरस्वती वैद्यच्या हत्येमध्ये कट-कारस्थान? तपास अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा

हत्यारं जप्त

चकमक झालेला भाग सॅनिटाईझ करण्याचं काम सुरु असून सर्व पाच ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये पाच AK-47 रायफल्स, 15 मॅगझिन्स, अॅम्युनिशन, ग्रेनेड्स, नाईट व्हिजन डिव्हाईस आणि दुर्बिणी जप्त करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com