esakal | 'जब कोई बात...'; कॉलेज फीसाठी गाणं गाणाऱ्या विद्यार्थ्याचा Video Viral
sakal

बोलून बातमी शोधा

'जब कोई बात...'; कॉलेज फीसाठी गाणं गाणाऱ्या विद्यार्थ्याचा Video Viral

'जब कोई बात...'; कॉलेज फीसाठी गाणं गाणाऱ्या विद्यार्थ्याचा Video Viral

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रत्येक व्यक्तीकडे स्वत:ची अशी एक कला असते जी त्याची ओळख असते. ती कला जोपासली तर चांगला कलाकार नक्कीच घडू शकतो. पण कित्येक जणांच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे ती कला जोपसणे कित्येकांना शक्य होत नाही. पण त्या अडचणींवर मात करून काही जण ती कला जोपसतात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्ररेणादायी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात परिस्थितीवर मात करत एक तरुण आपली कला जोपसण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका रस्त्यावर उभा आहे. हातात गिटार घेऊन हा तरुण त्याचा मधुर आवाजात जब कोई बात बिगड जाए हे गाणं गात आहे. हा तरुण एका म्युझिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून फि भरण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून तो लोकांसाठी गाणे गाऊन आर्थिक मदतीची मागणी करत आहे. दरम्यान, तेथे असलेले लोक तरुणाचे गाणे ऐकून त्याला मदत करत आहे. लोक डिजिटल पेमेंटद्वारे त्या तरुणाला आर्थिक मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. सोशल मिडियावर तरुणाच्या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा तरुणाच्या गाण्याची भुरळ बॉलीवूड स्टार्सला देखील पडली आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि कुणाल कपूर यांनी या मुलांचे खूप कौतुक केले आहे. हा व्हिडिओ अंकित टुडे नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

तरुणाच्या या व्हिडिओवरुन कित्येकांना आपली कला जोपसण्याची प्रेरणा मिळत आहे.

हेही वाचा: शस्त्र घेऊन WhatsApp Status टाकणाऱ्याला 'खाकी'चा दणका

loading image
go to top