

Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after his health condition deteriorated; doctors monitoring treatment.
Former Vice President Jagdeep Dhankhar hospitalized : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली आहे. आता त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. धनखड हे आता ७४ वर्षांचे असून त्यांना यापूर्वीही अनेकदा आरोग्य समस्या उद्भवलेल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार १० जानेवारी रोजी धनखड हे बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये नेण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीसाठी दाखल करण्याचा सल्ला दिला आणि एमआरआय देखील काढण्यात आला.
जगदीप धनखड यापूर्वीही अनेक ठिकाणी बेशुद्ध झाले आहेत. ज्यामध्ये कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली यांचा समावेश आहे. त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिवसभर राज्यसभेचे कामकाज अध्यक्षपद भूषवले आणि त्यानंतर धनखड यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवर त्याच रात्री दिसला. त्यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख केला होता. तर विरोधी पक्ष आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यामागील कारण आरोग्य नाही तर दुसरे काहीतरी असल्याचे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.