K Annamalai : ''मला धमकावणारे राज अन् आदित्य ठाकरे कोण?''; के अन्नामलाईंचा सवाल!

Annamalai respond MNS : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अन्नामलाईंवर टीका करताना, रसमल्लाई असा त्यांचा उल्लेख करत खिल्ली उडवली होती, असाही सवाल केला आहे.
 K. Annamalai controversial statement on Mumbai

K. Annamalai controversial statement on Mumbai

ESakal

Updated on

BJP leader Annamalai issues a strong challenge to MNS over Mumbai remarks : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर तामिळाडूमधील भाजप नेते के. अन्नामलाई यांनी देखील प्रत्युत्तर देत आव्हान दिलं आहे.  त्यांनी म्हटलं की ते मुंबईत नक्कीच येतील आणि जर हिंमत असेल तर त्यांचे पाय कापून दाखवा.

चेन्नईमध्ये माध्यमांशी बोलताना अन्नामलाई यांनी त्यांना धमकावणारे आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय त्यांनी अभिमानाने स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हटलं आणि सांगितलं की, ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत.

 अन्नामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना, रसमल्लाई असा त्यांचा उल्लेख करत खिल्ली उडवली होती. एवढंच नाहीतर काही मनसे समर्थकांनी अन्नामलाई मुंबईत आल्यास त्यांचे पाय कापून टाकण्याची धमकीही दिली होती.

तर अन्नामलाई यांनी या धमक्यांना अज्ञानता संबोधतले आणि म्हटले की, जर ते घाबरले असते तर त्यांच्या गावातच राहिले असते. तसेच त्यांनी सांगितले की, मुंबई एक ग्लोबल शहर आहे आणि त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.

 K. Annamalai controversial statement on Mumbai
Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

के अन्नामलाई यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या वक्तव्यांना पूर्णपणे अज्ञानतापूर्ण म्हटले. तसेच त्यांनी असेही सांगितले की, जर ते कामराज यांना भारताचे महान नेते म्हणत असतील, तर याचा अर्थ असा नाही की ते तामिळ राहिले नाहीत. याचप्रमाणे मुंबईला जागतिक शहर म्हणण्याचा अर्थ असा नाही, की ते मराठी भाषिकांचे योगदान नाकारत आहेत. अन्नामलाईंनी म्हटले की केवळ त्यांच्यावर टीका करण्यासाठी, अपशब्द वापरण्यासाठीच सभा घेतल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांचे वाढते महत्त्व दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com