जयपूर साखळी स्फोटप्रकरणी पाच जण दोषी; 71 जणांचा झाला होता मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

जयपूरमध्ये 11 वर्षांपूर्वी 13 मे 2008 ला आठ जागांवर साखळी स्फोट झाले होते. या प्रकरणी विशेष न्यायालयाने सुनावणी करताना पाचही आरोपींना दोषी ठरविले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजयकुमार शर्मा यांनी राज्य सरकारसह आरोपींची बाजू ऐकून घेऊन निकाल दिला.

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये 2008 मध्ये झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने आज (बुधवार) पाच जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. या स्फोटात 71 जणांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जयपूरमध्ये 11 वर्षांपूर्वी 13 मे 2008 ला आठ जागांवर साखळी स्फोट झाले होते. या प्रकरणी विशेष न्यायालयाने सुनावणी करताना पाचही आरोपींना दोषी ठरविले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजयकुमार शर्मा यांनी राज्य सरकारसह आरोपींची बाजू ऐकून घेऊन निकाल दिला. या प्रकरणाची सुनावणी करणारे अजयकुमार शर्मा हे आठवे न्यायाधीश आहेत. 

नाट्यवादळ विसावले!

या प्रकरणातील पाच दोषी शाहबाज हुसैन, मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि सलमा यांच्या शिक्षेवरील सुनावणी लवकरच होणार आहे. या प्रकरणातील अन्य चार आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या स्फोटात 71 जणांचा मृत्यू झाला होता, तर 185 नागरिक जखमी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaipur Bomb Blast case of 2008 all 5 accused convicted by Special Court

Tags
टॉपिकस
Topic Tags: