Jaipur accident news
esakal
जयपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यावेळी १२० किमी प्रती तास वेगाने येणाऱ्या ऑडी कारनं १६ जणांना उडवलं आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १६ जण जखमी झाले आहेत. यापैकी ४ जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर रस्त्यावर चांगलाच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. या घटनेत आठ दुकानांचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.