Jaipur family court divorce case : जेव्हा एखाद्या नात्याची सातत्याने उपेक्षा होते, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. असाच एक असामान्य प्रकार जयपूरमधून समोर आला आहे. येथे एका पत्नीने गेली १५ वर्षे शारीरिक संबंधांना नकार दिल्याने वैतागलेल्या पतीने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज मंजूर करताना पत्नीचा नकार हा ‘मानसिक क्रूरता’ असल्याचे स्पष्ट केले.