Jaipur man ends life after emotional trauma : राजस्थानच्या जयपूरमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपले आयुष्य संपवले आहे. १५ मे २०२५ रोजी ही धक्कादायक घटना घडली. मृत्यूपूर्वी त्याने २३ पानांची सुसाइड नोट लिहून आत्महत्येचे कारण सांगितले आहे. माझे माझ्या काकावर प्रेम असून ते सिद्ध करण्यासाठी मी आत्महत्या करत असल्याचे तो म्हणाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी काकाचा शोध घेतला जात आहे.