Jairam Ramesh: याद्यांचे पुनरावलोकन भाजपच्या इशाऱ्यावर; निवडणूक आयोगावर काँग्रेसची प्रखर टीका

Bihar Voter List: बिहारच्या अंतिम मतदारयादीतील मोठ्या प्रमाणातील गैरप्रकारांवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. एका घरात २४७ मतदार आणि एकाच मतदार केंद्रात एकाच व्यक्तीचे नाव तीन वेळा यासारख्या अनियमितता समोर आल्या आहेत.
Jairam Ramesh

Jairam Ramesh

sakal

Updated on

नवी दिल्ली : बिहारमध्ये एका घरात २४७ मतदार, एका मतदार केंद्रात एकाच व्यक्तीचे नाव तीन-तीन वेळा यासारखे  गैरप्रकार अंतिम मतदारयाद्यांमध्ये दिसत असून भाजपच्या ‘बी टीम’च्या  रुपात काम करणाऱ्या निवडणूक आयोगाने पूर्णपणे सभ्यता सोडली असल्याची कडवट टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com