INS विक्रांतच्या श्रेयवादावरून नव्या वादाला सुरूवात; काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INS VIKRANT

INS विक्रांतच्या श्रेयवादावरून नव्या वादाला सुरूवात; काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल

INS Vikrant : पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. एकीकडे INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाल्याने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. मात्र, दुसरीकडे या युद्धनौकेच्या श्रेयवादावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी INS विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचे श्रेय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

रमेश म्हणाले की, आयएनएस विक्रांत हे केवळ मोदी सरकारचे एकट्याचे यश नसून 1999 नंतरच्या सर्व सरकारचे सामूहिक प्रयत्नांचे परिणाम असल्याचे म्हटले आहे. सर्व सरकारांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून, हे सत्य मोदी मान्य करतीय का? असा सवाल जयराम रमेश यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना केला आहे.

हेही वाचा: INS Vikrant: भारतानं गुलामगिरीची निशाणी उतरवली- PM मोदी

जयराम रमेश यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताची पहिलं स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांत आज 1999 पासून सर्व सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहे. पंतप्रधान ते मान्य करतील का? 1971 च्या युद्धात या यद्धनौकेने चांगली कामगिरी केल्याचं सांगत कृष्णा मेनन यांचा ही युद्धनौका यूकेमधून आणण्यात मोलाचा वाटा होता याची आठवणदेखील रमेश यांनी मोदींना करून दिली आहे

INS विक्रांत हिंद-पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी योगदान देईल असा विश्वास यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. सुरुवातीला मिग-29 जेट विमाने पहिली काही वर्षे युद्धनौकेवरून उड्डाण घेणार आहेत. आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात कार्यान्वित होणे हे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Web Title: Jairam Ramesh Targets Pm Modi For Taking Credit For Ins Vikrant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..