
Jaisalmer Bus Fire Kills 20 People, Several Injured in Rajasthan Highway Tragedy
Esakal
राजस्थानमध्ये जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी दुपारी खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली. या बसमधून ५७ जण प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर १६ जण गंभीररित्या होरपळले आहेत. जखमी प्रवाशांवर जोधपूरमध्ये उपचार केले जात आहेत. जैसलमेर ते जोधपूरपर्यंत २७५ किमी लांब ग्रीन कॉरिडॉर तयार करून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.