जामिया मिलिया, ऑक्सफॅम इंडियासह १२ हजार NGO वर केंद्राची कारवाई

Jamia Millia Islamia
Jamia Millia Islamia
Summary

देशभरातील ऑक्सफॅम इंडिया ट्रस्ट, जामिया मिलिया इस्लामिया यांच्यासह बड्या संघटनांचा समावेश असलेल्या बारा हजारांपेक्षाही अधिक एनजीओंची ‘एफसीआरए’ कायद्याअंतर्गतची नोंदणी रद्द झाली आहे.

नवी दिल्ली - आयआयटी दिल्ली (IIT Delhi), जामिया मिलिया इस्लामिया(Jamia Milia Islamia) , इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल (Nehru Memorial) म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक लागला आहे. यातील अनेक संस्थांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नसल्याने तर काहींना केंद्राने सूचना दिल्यानंतर देखील त्यांनी परवान्याचे नूतनीकरण निर्धारित वेळेमध्ये न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांनी त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केला नव्हता. या परवाना नूतनीकरणाची डेडलाईन ही शुक्रवारी (ता.३१) संपत असल्याने या संस्थांना केंद्राकडून तशी आठवण देखील करून देण्यात आली होती पण त्यातील अनेकांनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केलेले नव्हते. अशा स्थितीमध्ये या संस्थांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. देशभरातील ऑक्सफॅम इंडिया ट्रस्ट, जामिया मिलिया इस्लामिया, दि इंडियन मेडिकल असोसिएशन अँड दि लेपरोसी मिशन यांच्यासह बड्या संघटनांचा समावेश असलेल्या बारा हजारांपेक्षाही अधिक एनजीओंची ‘एफसीआरए’ कायद्याअंतर्गतची नोंदणी रद्द झाली आहे.

Jamia Millia Islamia
योगी पहिल्यांदाच लढवणार विधानसभेची निवडणूक?

या संस्थांचाही समावेश

परकी योगदान (नियमन) कायद्याशी संबंधित अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार ‘एफसीआरए’ कायद्यांतर्गत ज्यांच्या परवान्यांची मुदत संपुष्टात आली आहे किंवा ज्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत अशा संस्थांच्या यादीत ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन’, ‘लाल बहाद्दूर शास्त्री मेमोरिअल फाउंडेशन’, ‘लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमन, ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड ऑक्सफॅम इंडिया’ यांचा समावेश आहे.

संख्येत घट

कोणतीही संघटना असो अथवा संस्थेला परकी निधी मिळविण्यासाठी ‘एफसीआरए’ कायद्याअंतर्गत नोंदणी करणे गरजेचे असते. देशातील ‘एफसीआरए’अंतर्गत नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्थांची संख्या शुक्रवारपर्यंत २२ हजार ७६२ एवढी होत, शनिवारी ती १६ हजार ८२९ वर पोचली. देशातील जवळपास ५ हजार ९३३ संस्थांची नोंदणी ही रद्द झाल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com