सांबा रोडवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी I Car Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Accident in Samba District

हे कुटुंब सांबाहून मानसर मार्गे श्रीनगरच्या दिशेनं जात होतं.

सांबा रोडवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

सांबा : सांबा जिल्ह्यात (Samba District) आज (शनिवार) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. सांबा जिल्ह्यातील मानसर भागात ही घटना घडलीय. संपूर्ण कुटुंब JK01U-2233 या कारमधून प्रवास करत होते. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळली आणि यात पाच जणांना जीव गमवावा लागलाय, असं नमूद केलंय.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब सांबाहून मानसर मार्गे श्रीनगरच्या (Srinagar) दिशेनं जात होतं. मानसर रोडवरील जमोद परिसरात एका वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं कार थेट दरीत कोसळली. दरम्यान, मार्गावरून जाणारे इतर लोक आणि स्थानिकांच्या मदतीनं कारमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं व तेथून त्यांना रुग्णालयात (Samba Hospital) नेण्यात आलं.

हेही वाचा: अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी फॅशन डिझायनरच्या मुलाला अटक

या कारमध्ये सहा जण होते. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी सर्व जखमींची तपासणी केली असता, त्यांनी पाच जणांना मृत घोषित केलं. पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, कारमधील सहाव्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येतंय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मृत व जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरुय.

Web Title: Jammu And Kashmir Five Dead One Injured In Samba Mansar Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..